डॉ. अनिल आखरे यांचे मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला मदतीचा धनादेश

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Anil Akhre : पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळात आले असता त्यांना महाराष्ट्रात जे नैसर्गिक अतिवृष्टीच्या संकटासाठी आर्थिक मदत म्हणून यवतमाळ आरोग्य भारतीचे जिल्हा सचिव व प्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल आखरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केला.
 
 
 
y4Oct-Anil-Aakhare
 
 
 
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भारतीय जनता पार्टी जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार नामदेव ससाने आणि उद्योगपती सुमित बाजोरिया यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रसतील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी ही आर्थिक मदत देण्यात आली.