उत्तर प्रदेश,
extramarital affair उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक अजब आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सहसवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढौलिया पट्टी तासौल गावातील रहिवासी हसन मुहम्मद यांनी आपली पत्नी नसरीन आणि ममेऱ्या भाऊ इशरतविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हसन यांचा गंभीर आरोप आहे की, त्यांची पत्नी सहा मुलांना सोडून ममेऱ्या भावासोबत घरातून निघून गेली आहे.
पीडित हसन मुहम्मद यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांच्या पत्नीने काही दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्यावर एक लेखी अर्ज दिला होता. त्यामध्ये तिने पतीकडे सहा मुलांना सोडून आपल्या ममेऱ्या भाऊ इशरतसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर ती मुलांना व पतीला सोडून इशरतसोबत निघून गेली.
या घटनेनंतर extramarital affair हसन मुहम्मद आपल्या चार मुली आणि दोन मुलांसह थेट सहसवान पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी आपल्या पत्नी आणि ममेऱ्या भावावर गुन्हा दाखल करून योग्य न्याय मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी असा आरोपही केला की, त्यांच्या मुलीनेच आईच्या इशरतसोबत असलेल्या संबंधांविषयी त्यांना सांगितले होते. इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडे याचे व्हिडिओ पुरावेही असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पीडित हसन यांचा आरोप आहे की, त्यांच्या ममेऱ्या भावाचे पत्नीसोबत मागील वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. प्रकरण इतक्यावरच न थांबता, पीडित पतीने असेही सांगितले की, आज सकाळी इशरत थेट त्यांच्या घरी आला आणि मुलांसमोरच धमकी दिली की, नसरीन आता त्याच्यासोबतच राहणार. एवढेच नाही, तर सासरच्या लोकांना एक लाख रुपये देण्याचा प्रस्तावही त्याने ठेवला आणि हसन यांना "ठिकाणावर लावण्याची" धमकी दिली.
या संपूर्ण प्रकारामुळे हसन यांना आता आपल्या आणि आपल्या मुलांच्या जीवाला धोका असल्याची भीती वाटू लागली आहे. त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, योग्य ती कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे गावात आणि परिसरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.