बल्लारशाह.
Ballarshah Mahadistribution Employees भक्तीभाव, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृती यांचा सुंदर संगम घडवित, बल्लारशाह येथील महावितरण उपविभागातील लाईनस्टाफ कर्मचारी आणि शाखा अधिकारी यांनी देवी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. ३ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. महाप्रसाद वितरणासोबतच कर्मचाऱ्यांनी घरगुती सौर ऊर्जा प्रणाली (सोलर) मीटरच्या फायद्यांबाबत जनजागृती केली. अनेक ग्राहकांनी उत्साहाने या विषयावरील माहिती घेतली आणि महावितरणकडून होणाऱ्या आधुनिक बदलांचे कौतुक केले.
सध्याच्या काळात महावितरणतर्फे ‘स्मार्ट वर्क’च्या दिशेने वाटचाल सुरू असून, त्याचा पहिला टप्पा म्हणजे सर्व ग्राहकांना TOD मीटर बसविण्याचा संकल्प असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमात सहभागी सर्व लाईनस्टाफ व अधिकारी यांनी ग्राहकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. या उपक्रमात डॉ. अतुल कोहपरे आणि माननीय जव्हेरी यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. Ballarshah Mahadistribution Employees विसर्जन मिरवणुकीत सहभागी सर्व भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि महावितरण कर्मचाऱ्यांच्या सामाजिक जाणीवपूर्वक उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. बल्लारशाह शहरात या अनोख्या उपक्रमाची चर्चा सर्वत्र रंगली होती. महावितरण लाईनस्टाफ कर्मचारी आणि शाखा अधिकाऱ्यांच्या या सामाजिक आणि जनजागृतीपर उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी व ग्राहकांनी भरभरून स्वागत केले.