पोलीस दलातील महिला पोलिसांसाठी चिमणीघर

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची संकल्पना

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
ravindra-singal : पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता पाळणाघर या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहर पोलीस दलामध्ये अनेक महिला अधिकारी आणि अंमलदार आपले कर्तव्य पार पाडत त्यांना अनेक वेळा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. शहर पोलीस दलातील महिलांच्या अडचणींबाबत समजले, तेव्हा त्यांनी ही अडचण ओळखून, पाळणाघर सुरू करण्याची संकल्पना साकार करण्याचे ठरविले.
 
 
 
singal
 
 
 
महिला पोलिस कर्तव्यावर असताना‡ लहान मुलांना कुठे ठेवावे,असा प्रश्न निर्माण होतो. कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे, विशेषतः लहान बालकांची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नसल्याने, आणि पती-पत्नी नोकरीवर असल्यामुळे आपत्यांची देखभाल करणे अत्यंत कठीण होते. हीच अडचण ओळखून, पोलीस आयुक्तांनी पाळणाघर सुरू करण्याचे ठरविले. यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ प्रिन्सी सोनी यांची निवड केली. या उपक्रमाची सुरुवात झाली असून पोलीस मुख्यालय, येथे या पाळणाघराचे उद्घाटन रवींद्र कुमार सिंगल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 
पोलीस दलांसाठी एक आदर्श
 
 
पोलीस सांगितले की, शहर पोलीस दलातील महिला अधिकारी व अंमलदार आपल्या जबाबदार्‍या प्रामाणिकपणे पार पाडतात. मात्र लहान मुलांच्या देखभालीमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ‘चिमणीघर’ पाळणाघर हा त्यांच्या हक्काचा दिलासा आहे. या उपक्रमामुळे कौटुंबिक जीवनात समतोल राखणे सुलभ होईलही सुविधा केवळ नागपूरपुरती मर्यादित न राहता इतर पोलीस दलांसाठीही एक ठरेल, असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला.
 
आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध
 
 
या पाळणाघराला चिमणीघर असे नामकरण करण्यात आले असून ज्याप्रमाणे लहान पक्ष्यांची काळजी प्रेमाने घेतली जाते, त्याच भावनेने या चिमणीघरात मुलांची देखभाल केली जाईल. हे केवळ नावापुरते नाही, तर येथे लहान मुलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. पोलीस उपायुक्त महक स्वामी, सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, निशा खोब्रागडे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अमोल दोंड, महिला पोलीस अंमलदार निधी, प्रियंका, पायल, पोलीस अंमलदार अनुराग, अंकित तसेच वेल्फेअर शाखेचे पिंपळेशेंडे आदींनी परिश्रम घेतले.