फिल्टर प्लांटमधील पाण्याच्या टाकीत घाण

*पाण्यात सिगारेटचे तुकडे, पाण्याच्या बाटला अन् दारूचे ग्लास

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट,
water filter plant संत चोखोबा वार्ड, सोनामाता मंदिर जवळ नपचा पाणीपुरवठा करणारा पाईप फुटला अन् नागरिकांना धका देणारी बाब समोर आली. पाईप दुरुस्ती दरम्यान पाण्याच्या प्रवाहात सिगारेटचे तुकडे, पाकीटं, पाण्याच्या बाटला आणि दारू पिण्याचे ग्लासही बाहेर आले. याबाबतची चौकशी केली असता मागील अनेक दिवसांपासून पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली नाही. सोबतच काही मद्यपी फिल्टर प्लांटमधील पाण्याच्या टाकीजवळच दारू पित असून कचरा पाण्याच्या टाकीतच टाकत असल्याचे पुढे आले. दरम्यान, नागरिकांनी संबंधित विभागाला पाण्याची टाकी स्वच्छ करावी, पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
 
 

water filter 
 
 
गेल्या काही महिन्यांपासून सतत पाणी वाहात असल्याने नागरिकांनी नगरपरिषदेला सूचना दिली. फुटलेल्या पाईपचे काम सुरू असताना त्यातून अक्षरशः पाणी बॉटल्स, सिगारेटचे पॅकेट व दारू पिण्याचे ग्लास निघाले. याबाबत नागरिकांनी चौकशी केली असता हा कचरा फिल्टर प्लांटमधून पाईपद्वारे आल्याची धकादायक बाब पुढे आली. युवकांनी थेट फिल्टर प्लांट गाठून परिसरात विचारणा केल्यावर येथे रात्रीच्या वेळी नशेखोर व मद्यपी टाकीवर बसून दारू पितात तसेच कचरा फिल्टर प्लांटमधील पाण्याच्या टाकीत टाकत असल्याचे पुढे आले. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून प्लांटमधील पाण्याच्या टाकीत घाण साचली असून पाण्याची दुर्गंधीही येत असल्याचे आढळले. नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाला निवेदन देत पाण्याची टाकी स्वच्छ करण्याची मागणी केली आहे.
आतापर्यंत वार्डातील नागरिक दुषित पाणी पित होते. दुषित पाण्यामुळे लहान मुलं आजारी पडत आहेत. पाणीपुरवठा करणार्‍या या टाकीमध्ये ब्लिचिंग पावडर व लोरीन गॅसचा नियमितपणे वापर न केल्याने पाण्यात दुर्गंधी पसरली होती. अधिकची माहिती घेतली असता पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ केली जात नाही.water filter plant त्यामुळे असा प्रकार घडत आहे. दरम्यान, नागरिकांनी अमोल वाघमारे यांच्या नेतृत्त्वात संबंधित विभागाला निवेदन दिले. फिल्टर प्लांटवर तसेच संपूर्ण पाण्याच्या टाकीवर विशेष लक्ष देऊन स्वच्छता ठेवावी व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. यानंतरही असाच प्रकार सुरू राहिल्यास आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.
निवेदन देतेवेळी शुभम घोडे, गणेश डहाके, सचिन चचाणे, उमेश डहाके, शेषराव लोंढे, मयूर सुखदिवे, कुणाल कांबळे, फिरोज शेख, स्वप्नील सुरसे, आदी उपस्थित होते.