वरोडा,
immersion mishap दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक सुरू असताना डीजे जनरेटरचा स्फोट झाल्याने 7 व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विसलोन गावात घडली.
वरोड्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या विसलोन गावात दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे डीजेचे साहित्य असलेल्या वाहनात मिरवणुकीतील महिला व लहान मुले बसली. यावेळी जनरेटरचा स्फोट झाला. यात ताराबाई पांडुरंग गोंडे (79), गुणाबाई आनंद कुरेकर (56), सुंदराबाई विठ्ठल डाखरे (63), अंकुश सुरेश मेश्राम (32), शोभा यशवंत बोबडे (63), यश बोबडे (4), कुमारी डांगे (4) हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने वरोडा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामध्ये ताराबाई गोंडे, शोभा बोबडे यांना प्रकृती गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. तर यश बोबडे व कुमारी डांगे यांच्यावर वरोडा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे
या संदर्भात माजरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार अमित पांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेत असल्याचे सांगितले.