गोंडवाना विद्यापीठाचा 14 वर्धापन दिन सोमवारी

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
गडचिरोली,
gondwana universitys गोंडवाना विद्यापीठाचा 14 वर्धापन दिन येत्या 6 ऑक्टोबर रोजी सोमवारी साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरासह उल्लेखनिय कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांना गौरविण्यात येणार आहे, अशी प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत दिली.
 
 

गोंडवाना  
 
 
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे राहणार असून नागपूर येथील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी अधिसभा, व्यवस्थापवन परिषद, विद्यपरिषद यांचे सदस्य आणि विद्यापीठातील विविध प्राधिकरण, मंडळ व समित्यांचे सदस्य यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाद्वारे देण्यात येणारा जीवनसाधना गौरव पुरस्कार हा ब्रम्हपूरी येथील मारोतराव कांबळे यांना तर चंद्रपूर येथील डॉ. नंदकिशोर हरिलाल खत्री यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उत्कृष्ठ अधिसभा सदस्य म्हणून गुरुदास कामडी, उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार डॉ. मृणाल काळे, उत्कृष्ठ महाविद्यालयीन शिक्षक पुरस्कार डॉ. अभय सोळंखी, पद्मश्री एस. आर. रंगनाथन उत्कृष्ठ ग्रंथपाल पुरस्कार डॉ. अनिल भोयर, उत्कृष्ठ विद्यशापीठ अधिकारी वर्ग-2 पुरस्कार प्रमोद बोरकर, उत्कृष्ठ विद्यापीठ कर्मचारी वर्ग-3 पुरस्कार अविनाश सिडाम, उत्कृष्ठ महाविद्यालयीन कर्मचारी वर्ग-3 पुरस्कार विनोद चोपावार यांना तर उत्कृष्ठ विद्यार्थीनी पुरस्कार रुपेश कुत्तरमारे यांना देण्यात येणार आहे.
याशिवाय आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञन महाद्यालय कुरखेडा, द्वितीय क्रमांक केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, तृतीय क्रमांक निलकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय भद्रावती तर उत्तेजनार्थ पुरस्कार आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालय देसाईगंज आणि शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजूरा यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.gondwana universitys  उत्कृष्ट विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्कार गजानन बोरकर यांना तर आदर्श विद्यार्थी म्हणून संघर्ष दिवाकर गजभिये, सिद्धी हेमंत उपाध्या या विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.