वर्धा,
Pankaj Bhoyar शासकीय सेवेतील एखाद्या कर्मचार्याच्या अचानक निधनानंतर कुटुंबातील सदस्यास अनुकंपा तत्वावर नियुती मिळविण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात बदल केल्याने हजारो कुटुंबांना न्याय मिळाला. अनुकंपा तत्वावर नियुत्या देण्याची प्रक्रिया सोपी झाली, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा तत्वावरील उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते नियुती आदेश देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे, तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात अनुकंपा तत्वावरील गट क ३०, गट ड २५ तर लोकसेवा आयोगाद्वारे निवडलेल्या ३९ अशा ९४ उमेदवारांना नियुती आदेश देण्यात आले. अनुकंपा नियुतीची प्रक्रिया आधी किचकट होती. नियुत्या देताना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या. कुटुंबातील कर्ती व्यती गेल्याने त्या कुटुंबाचे दु:ख काही प्रमाणात का होईना कमी करता आले पाहिजे, यासाठी धोरणात बदल करण्यात आले. त्यामुळेच राज्यात आज एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुत्या देता आल्या. वर्धा छोटा जिल्हा आहे. येथील प्रत्येक युवक नोकरीसाठी धडपडत असतो. नोकरीची संधी मिळाली पाहिजे अशी त्यांची भावना असते. राज्य शासनाने नोकर भरतीचे चांगले धोरण आणल्याने हजारो युवकांना परिश्रमाच्या बळावर हकाची शासकीय नोकरी उपलब्ध होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, अनुकंपा नियुतीसाठी राज्य शासनाने अतिशय चांगले धोरण आणले आहे. त्यामुळे तातडीने नियुत्या मिळून कुटुंबावरील संकट कमी होण्याचे प्रयत्न होत आहे. शासकीय नोकरीमुळे कुटुंबाला आधार मिळतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी ना. भोयर यांच्या हस्ते अनुकंपा व लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या काही उमेदवारांना आदेश देण्यात आले. त्यानंतर सर्वच उमेदवारांना आदेश देण्याची प्रक्रिया झाली.