अमरावती,
i love mohammed कुर्ला (मुंबई), नागपूर, अहिल्यानगर भागात आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरवरून उठलेले वादळ आणि त्याचे वादात रूपांतर झाल्यानंतर हाच ट्रेड सध्या अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रात पाहायला मिळतोय. चक्क शासकीय मालकीच्या उड्डाण पुलावर 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अमरावतीत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रदेशातील कानपूर येथून सुरू झालेल्या 'आय लव्ह मोहम्मद'च्या वादाचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. याला उत्तर म्हणून अनेक ठिकाणी 'आय लव्ह महादेव' असे बॅनर झळकल्याचे पहायला मिळाले. याच प्रकारातून मुंबईतील कुर्ला, नागपूर आणि अहिल्यानगर भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज केल्याच्याही घटना घडल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच अमरावतीतही 'आय लव्ह मोहम्मद'चा ट्रेड पश्चिम क्षेत्रात पाहायला मिळतोय. अमरावती शहरातील चित्रा चौकापासून ते नागपुरी गेट पोलिस स्टेशन क्षेत्रात जाणाऱ्या शासकीय उड्डाण पुलावर चक्क 'आय लव्ह मोहम्मद'चे टिकर्स लागल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. त्यामुळे अमरावतीत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेत सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रात लागलेले आय लव्ह मोहम्मदच्या बॅनरवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
दंगे करण्याचे कटकारस्थान शिजतेय : अनिल बोंडे
या संपूर्ण प्रकरणावर तीव्र आक्षेप घेत खासदार अनिल बोंडे म्हणाले, 'आय लव्ह मोहम्मद'चेबॅनर लावून अमरावतीत दंगे करण्याचे कटकारस्थान शिजत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. एवढेच आय लव मोहम्मद लावायच आहे तर त्यांनी त्यांच्या दुकानात, टॅक्सी, ऑटोमध्ये लावावे.i love mohammed हिंदूही ठरवतील त्यांच्या दुकानात जायचे की नाही. ऑटोमध्ये बसायचे की नाही, असेही अनिल बोंडे यांनी म्हटले आहे. कोणी जास्त मस्तीमध्ये आले तर त्याची मस्ती उतरविण्यात महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन सक्षम आहे, असा गंभीर इशारा देखील खा. बोंडे यांनी दिला आहे.