अवैध वाळू वाहतूक दोन जणांना अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
बुलढाणा, 
Buldhana sand smuggling, अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी शिवारात दि. ४ ऑटोबरच्या उत्तररात्री गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, देऊळगाव राजा तालुयात अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशावरून वाळू वाहतूक प्रकरणी कारवाईसाठी गुन्हे शाखेला आदेशित करण्यात आले होते.
 

अवैध वाळू वाहतूक दोन जणांना अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई 
 
 
दि. ४ ऑटोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चिखली तालुयातील अंचरवाडी शिवारात एका टिप्परमध्ये अवैध वाळूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे, ठिकाणी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता पिवळ्या रंगाचे एक टिप्पर उभे दिसले. यामध्ये, अंदाजे दोन ब्रास वाळू (किंमत, २० हजार) आढळून आली. चालकाला परवाना बाबत विचारणा केली असता, विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून टिप्पर जप्त करून चालक आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. यामध्ये आरोपी जीवन महादू वाघ रा. भानखेड ता. चिखली, सुरज सदाशिव जाधव रा. बेराळा ता. चिखली यांचा समावेश आहे. या कारवाईत एकूण १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील आंबुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजार, हेडकॉन्स्टेबल दिगंबर कपाटे, कॉन्स्टेबल निलेश राजपूत, चालक समाधान टेकाळे यांनी केली.