उत्तर प्रदेश,
Kanpur couple suicide उत्तर प्रदेशातील कानपूर देहात जिल्ह्यातील एका गावात गुरुवारी सकाळी मोठी खळबळ उडाली, जेव्हा स्थानिक नागरिकांनी झाडीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना झाडीत एक युवक आणि एका किशोरीचे अर्धविखंडित मृतदेह आढळले. मृतदेहाजवळ सल्फासच्या गोळ्या आणि दोन गिलासही सापडले असून, ही आत्महत्या की हत्या, याबाबत चौकशी सुरू आहे.
ही Kanpur couple suicide धक्कादायक घटना देवराहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेड़ौवा गावाची असून, मृत युवक आणि युवती अनुक्रमे भाऊजीं -साळी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही २५ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. आठवडाभराच्या शोधानंतर त्यांचे मृतदेह गुरुवारी मूसानगर पोलीस ठाण्याच्या किशवा दुरौली गावातील जंगलात सापडले.
प्रेमसंबंध आणि कुटुंबीयांचा विरोध
प्राप्त माहितीनुसार,Kanpur couple suicide २५ वर्षीय उमाकांत हे राजापुर पोलीस ठाण्याच्या खरतला गावचे रहिवासी होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह मूसानगर गावातील रिंकी ऊर्फ रूपमशी झाला होता. विवाहानंतर उमाकांत सासरी ये-जा करू लागले आणि त्याचा आपल्या अल्पवयीन साळीशी प्रेमसंबंध निर्माण झाला. ही गोष्ट युवतीच्या आई-वडिलांना समजताच त्यांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, किशोरी न ऐकल्याने त्यांनी तिच्याशी संबंध तोडले.त्यामुळे ती जवळपास दीड वर्षांपूर्वी देवराहट परिसरातील बेड़ौवा गावात आपल्या आजोबा रामदीनकडे राहायला आली होती. रामदीन यांनी सांगितले की, २५ सप्टेंबर रोजी उमाकांत तिच्यासोबत बाहेर गेला आणि दोघे परतलेच नाहीत. नंतर त्यांनी देवराहट पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप
गुरुवारी जेव्हा दोघांचे मृतदेह जंगलात सापडले, तेव्हा या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली. माहिती मिळताच भोगनीपूरचे सीओ आणि मूसानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ओळखल्यानंतर नातेवाईकांना माहिती देण्यात आली.मृत युवतीचे आजोबा रामदीन यांनी पोलिसांवर गंभीर निष्क्रियतेचा आरोप करत सांगितले की, वेळेवर शोध घेतला गेला असता, तर दोघांचे प्राण वाचू शकले असते. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे.
मृतदेहाजवळ सापडलेल्या सल्फासच्या गोळ्यांमुळे हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृतदेहांची स्थिती आणि काही संशयास्पद बाबी लक्षात घेता, हत्या झाल्याचीही शक्यता पोलिस नाकारत नाहीत. दोघांचे शरीर प्राण्यांनी खाल्ले होते असे पोलिसांनी सांगितले आहे.सध्या पोलीस विविध अंगाने तपास करत असून, कुटुंबीयांचे जबाब, कॉल रेकॉर्ड्स आणि फॉरेन्सिक तपासाच्या आधारावर प्रकरणाचा खुलासा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.