नगरपालिका निवडणुकीचा शंखनाद

सोमवारी नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
karanja municipal election राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.या निवडणुकांसाठी मतदारांची नावे निश्ति करण्यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत तयार झालेली विधानसभेची मतदार यादी आधारभूत म्हणून वापरली जाणार आहे. म्हणजेच संबंधित तारखेपर्यंत विधानसभा मतदार यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांचाच समावेश या नगरपालिकांच्या मतदार यादीत केला जाईल.या कार्यक्रमात नवीन मतदार नोंदणी करता येणार नाही. विशेष म्हणजे विधानसभा मतदार यादीत नसलेल्या व्यक्तींना आता या निवडणूक कार्यक्रमात नाव नोंदविता येणार नाही. त्यामुळे अनेक इच्छुक मतदारांना या निवडणुकीतून वंचित राहावे लागणार आहे.
 
 

muncipal  
 
 
आयोगाने स्पष्ट केले आहे की, या कार्यक्रमात केवळ प्रभागनिहाय मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप नोंदविणे, दुरुस्त्या मागणे किंवा नावांच्या चुकीच्या नोंदी सुधारण्यासाठी अर्ज करणे यालाच परवानगी दिली जाईल. मात्र नवीन नावे समाविष्ट करता येणार नाहीत. जाहीर मतदार यादी कार्यक्रमानुसार ८ ऑटोबर प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी ८ ऑटोबर ते १२ ऑटोबर १३ ऑटोबर अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे, २८ ऑटोबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करणे आणि ७ नोव्हेंबरला प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. संबंधित मुख्याधिकारी यांनी विधानसभेच्या मतदार याद्यांचे बाबींचा विचार करुन प्रभागनिहाय विभाजन करावे. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.karanja municipal election नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाल्याने स्थानिक राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विविध पक्षांनी आधीपासूनच तयारीला सुरुवात केली होती. मात्र मतदार यादीतील मर्यादा लक्षात घेता अनेक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.अनेक नागरिकांनी आधी विधानसभा मतदार यादीत नाव नोंदवलेले नसल्यामुळे या निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही.
सोमवारी ६ ऑटोबर रोजी मुंबई मंत्रालयात नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रात राजकीय वातावरण तापले असून, इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. आरक्षण सोडतीनंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.