धक्कादायक! नागपूरच्या दाम्पत्याचा इटलीत अपघाती मृत्यू

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur couple dies in Italy इटलीत पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील दाम्पत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या दाेन मुली आणि मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी ग्राेसेटाेजवळील राज्य महामार्ग एक ऑरेलियावर हा अपघात झाला. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. मृत दाम्पत्यामध्ये जावेद अख्तर (55, सिव्हिल लाइन्स) आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन (47) यांचा समावेश आहे.
 

Nagpur couple dies in Italy 
 
 
जावेद अख्तर हे सीताबर्डी येथील हाॅटेल गुलशन प्लाझाचे मालक आहेत. त्यांची माेठी मुलगी आरजू अख्तर (22) तर धाकटी मुलगी शिा अख्तर (20) आणि मुलगा जाजेल अख्तर (14) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. जावेद अख्तर दरवर्षी नवरात्रीत त्यांच्या कुटुंबासह विदेशात पर्यटनाला जात असतात. यावेळी ते 23 सप्टेंबर राेजी त्यांची पत्नी नादिरा गुलशन, मुलगी आरजू अख्तर आणि शिा अख्तर आणि मुलगा जाजेल अख्तर यांच्यासह इटली-राेमला गेले हाेते. 5 ऑक्टाेबर राेजी कुटुंब नागपूरला परतणार हाेते. गुरुवारी सकाळी इटलीच्या ग्राेसेटाजवळ हे कुटुंब सहलीसाठी निघाले हाेते, तेव्हा वाहनाचा अपघात झाला. उत्तर दिशेकडे जाणाèया कॅरेजवेवर एक व्हॅन आणि आशियाई वंशाच्या पर्यटकांना घेऊन जाणाèया नऊ आसनी मिनीबसचा समावेश हाेता. व्हॅनमधील तिघांना मदत बरीच उशिरा पाेहाेचली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच, कुटुंबातील काही सदस्य इटलीला रवाना झाल्याची माहिती आहे.