हिंगणघाट,
Nandgaon car accident तालुयातील नांदगाव येथील कोरकु बेडा परिसरात आज शनिवार ४ रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहे. बेहरू कुमा किन्नाके (३०) असे मृतकाचे नाव आहे.
लखन ताराचंद मडावी (३५), रा. कोरकु बेडा नांदगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते स्वतः, त्यांचे वडील ताराचंद मडावी, चुलतभाऊ बेहरू कुमा किन्नाके, जयेश जसवंत उईके आणि चुलत बहीण शांती नायक आत्राम हे नांदगाव येथील चरणसिंग कुडमते यांच्या किराणा दुकानासमोर बसले होते. दरम्यान, गावातीलच अजय चरणसिंग कुडमते हा एम. एच. ४९ सी. डी. ५८८० क्रमांकाची कार भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत आला आणि थेट दुकानासमोर बसलेल्या पाचही जणांना धडक दिली. यात बेहरू कुमा किन्नाके यांचा जागीच मृत्यू झाला, तर लखन मडावी, ताराचंद मडावी, शांती आत्राम व जयेश उईके हे गंभीर जखमी झाले. जयेश उईके यांच्या पायाला फ्रॅचर झाल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींना हिंगणघाट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉटरांनी तपासाअंती बेहरू कुमा किन्नाके यांना मृत घोषित केले.या प्रकरणी अजय कुडमते याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.