अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवडीस प्रोत्साहन द्या

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शेतकर्‍यांना आवाहन -बाजारपेठेच्या मागणीनुसार पीकपद्धतीत बदल करा -बेला येथे शेतकरी मेळावा

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nitin Gadkari : शेतकर्‍यांनी बाजारपेठेच्या मागणी नुसार ‘पीक बदल करून उत्पन्नवाढ करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करावेत. पूर्ण क्षमतेने साखर कारखाने चालावेत यासाठी नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऊस लागवडीस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी केले.
 
 
gadkari
 
 
 
मानस ऍग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या वतीने बेला येथे आयोजित शेतकरी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मानस समूहाचे उपाध्यक्ष जयकुमार वर्मा, आमदार आशिष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे, राजू पारवे, आनंदराव राऊत, अनिल मेंढे, नरेंद्र जीवतोडे, प्रबंध संचालक समय बनसोड, संचालक फकिरा खडसे, शेषराव भोयर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
ऊस पुरवणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार
 
 
याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते कारखान्याला सर्वाधिक ऊस शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात गडकरी पुढे म्हणाले, ‘शेतकरी इंधनदाता व्हावा यासाठी मी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. भारताला संपन्न बनवायचे असेल, तर ग्रामीण भाग सुध्दा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. या परिवर्तनाचा केंद्रबिंदू शेतकरीच आहे. शेतकर्‍याचे उत्पन्न वाढले, तर देशाचे अर्थकारण मजबूत होईल. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात उत्पादन आणि मूल्यवृद्धी या दोन्ही दिशांनी पुढे जायला हवे.’
 
शेतकर्‍यांनी आपला प्रदेश कृषी समृद्ध बनवावा
 
 
साखर कारखाना सुरु करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, शेतकर्‍यांच्या सहकार्याने आणि चिकाटीने आपण त्या सर्व अडचणींवर मात केली. आज साखर कारखाना यशस्वीपणे चालत आहे आणि त्याचे श्रेय शेतकर्‍यांना जाते. ‘ऊसाबरोबरच इतर पिकांच्या संदर्भातही ‘ऍग्रो माध्यमातून आम्ही सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळा आणि जागरुकता कार्यक्रम राबवत आहोत. विदर्भातील शेतकर्‍यांनी या कृषी चळवळीत सहभागी होऊन आपला प्रदेश कृषी समृद्ध बनवावा,’ असे आवाहन गडकरी यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जयकुमार वर्मा, महाव्यवस्थापक जयंत ढगे, नरेश गेडेकर यांनी परिश्रम घेतले.