वर्धा,
Nitin Gadkari, सेलू तालुयातील विविध ठिकाणच्या पांदण रस्त्यांचे बांधकाम, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जनसुविधा अंतर्गत रस्ते व नाली तसेच ९१ विविध विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
सेलू तालुयातील माहेर मंगल कार्यालयाजवळ जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या भूमीपूजन कार्यक्रमाला राज्याचे गृह, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक अनुराग जैन, सुधीर दिवे, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अनुदान योजनेतून अकोली, बाभुळगाव, महाबळा, धानोली मे, शिवणगाव, क्षिरसमुद्र, गोंदापूर, जयपूर, जुवाडी, खडका, जुनगड, मोर्चापूर, सोंडी, चारमंडळ, वडगाव ज., रिधोरा, माई, वडगाव, सालई पे., खैरी का., टाकळी झ., वाहीतपूर, घोराड, केळझर, मोई, तुळजापूर वघाळा, जुनोना, किन्हाळा, हेलाडी, बोरगाव, टाकळी झ., हिंगणी, कान्हापूर, रमना, खैरी का., जामणी, नवरगाव, कान्हापूर या गावातील रस्त्यांचे तसेच स्मशानभूमी सौंदर्यीकरण, ग्रामपंचायत भवन, संरक्षण भिंत अशा ४० विविध ५ कोटी ५५ हजार रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन झाले.
तसेच सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २८ कामे ६ कोटी ५२ लाख रुपये, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत १७ रस्ते २ कोटी ६० लाख रुपये व जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ६ रस्ते ३ कोटी ३० लाख रुपयांच्या रस्ते बांधकामाचे भूमीपूजनही करण्यात आले. यात एकूण विविध ९१ विकासकामांचा समावेश आहे.यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, तहसिलदार मलीक विराणी यांच्यासह सेलू तालुयातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.