प्रा. डॉ. अनिल भोयर यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
कुरखेडा,
dr anil bhoyar दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुगघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. अनिल अभिमनजी भोयर यांना गोंडवाना विद्यापीठाचा पद्मश्री एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे.
 
 

anil bhoyar 
 
 
डॉ. अनिल भोयर हे मुनघाटे महाविद्यालयात 31 वर्षापासून ग्रंथालय विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे एक मायनर प्रोजेक्ट (यूजीसी) पूर्ण झालेली असून त्यांनी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर कार्य केले आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र अभ्यास मंडलाचे अध्यक्ष म्हणून तसेच विद्यापीठाच्या आर. आर. सी. चे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनात तीन विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संशोधन पेपर प्रकाशित झाले असून पाच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या एका पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता मिळालेली आहे.dr anil bhoyar डॉ. भोयर हे इंडियन लायब्ररी असोसिएशन, नवी दिल्ली महाराष्ट्र कॉलेज लायब्ररी असोसिएशन, नागपूर युनिव्हर्सिटी कॉलेज लायब्ररी असोसिएशन, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, एन.डी.एल. आयचे सचिव म्हणून कार्य करीत आहेत. तसेच लायन्स क्लब सदस्य म्हणून कार्य करीत आहेत.
गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून उद्या, 6 ऑक्टोबर रोजी सोमवारी भव्य समारंभात त्यांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे, ग्रंथालय सल्लागार मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाच्या एन. डी. एल. आय. क्लब पदाधिकारी, सदस्य तथा सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.