आमराई कट्टा महिला मंडळाचा शारदोत्सव

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Jaiprakash Nagar नागपूरमधील साई इन्कलेव, जयप्रकाश नगर येथील आमराई कट्टा महिला शारदोस्त्सव मंडळाने आपल्या पाचव्या वर्षी शारदोत्सवाचे उत्साहात आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी म्हणजेच काल सायंकाळी ६ वाजता देविस्थापनाने झाली. आज रात्री ९ वाजता जयप्रकाश नगर भजन मंडळाने भजनांची सुसंगत सुरेल मैफील सादर केली. दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वाजता आणि रात्री ८ वाजता सुंदरकांड, संगीत खुर्ची व गरब्याचा कार्यक्रम पार पाडणार.
 
Jaiprakash Nagar
 
दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजता एक मिनिट गेम, भूलाबाईंची गाणी आणि होममिनिस्टर यांचा सांगीतिक अनुभव रसिकांसमोर सादर केला जाईल. दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजता महाप्रसादाचा सोहळा पार पडणार, आणि मंडळाचे सदस्य व पाहुणे आनंदोत्सवात सहभागी होईल. Jaiprakash Nagar दिनांक, दि. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता शारदादेवीचे विसर्जन करण्यात येईल, ज्याने या उत्सवाला समारोप दिला जाईल. या शारदोत्सवात स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम रंगतदार होणार असून, महिला मंडळाच्या कार्यकारिणीने यावर्षीही उत्साहपूर्ण आणि यशस्वी कार्यक्रम राबवणार.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र