नागपूर,
Smart City Project शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सिमेंट रोड व इतर सोयीसुविधांचा विकास होत आहे. रस्त्यांच्या मधोमध लावलेली झाडे शहराचे सौंदर्य वाढवतात, मात्र काही ठिकाणी रोड डिव्हायडरवरील झाडांच्या अवास्तव वाढलेल्या फांद्या व गवतामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषत: सिग्नलवर दुचाकीस्वारांना या फांद्यांचा अडथळा होतो. डिव्हायडरवर वाढलेल्या झुडुपांमुळे जनावरांचा वावरही वाढला असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.हे दृश्य नरेंद्र नगर ते मानेवाडा रोड, शताब्दी चौक ते तुकडोजी पुतळा तसेच वर्धा रोडवरील काही भागांत स्पष्ट दिसते.Smart City Project प्रशासनाने त्वरित लक्ष घालून या फांद्या व झुडपे छाटल्यास वाहतूक सुरळीत होईल व अपघातांचा धोका कमी होईल.
सौजन्य :संजय श्रौती,संपर्क मित्र