श्री साई पादुका दर्शन सोहळा

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Sri Sai Paduka Darshan Ceremony : श्री साईबाबा संस्थान, सद्गुरू साई चरिटेबल ट्रस्ट आणि साई भक्त साई परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय श्री साई पादुका दर्शन सोहळा चिटणीस पार्क, महाल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पंकज महाजन व राजीव जयस्वाल यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 
sai baba
 
 
साईभक्तांना श्री साईंच्या पवित्र दर्शन चिटणीस पार्क, महाल येथे १०, ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी घेता येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून साईभक्तांना श्री साईंच्या कृपाशिर्वादाचा लाभ घेण्याची संधी आहे.
 
 
श्री साईंच्या आगमनाच्या स्वागतार्थ महिलांच्या सहभागातून विशेष बाईक रॅलीचे आयोजन १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. बाईक रॅलीनंतर श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे. संध्याकाळी ६.३० वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक महाल येथील गडकरी वाडा येथून सुरू होईल.मिरवणुकीचा समारोप चिटणीस पार्क येथे होईल. तसेच १२ ऑक्टोबर रोजी पारायण, साईभक्त संमेलन आणि दीपोत्सव सोहळ्याने वातावरण साईमय होईल.