नागपूर,
Ishwar Balbudhe : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची राज्य अन्न आयोगाचे सदस्य या पदावर पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग द्वारे पूर्णवेळ नियुक्तीचा निर्णय करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने ईश्वर बळवंतराव बाळबुद्धे यांची नियुक्ती ही पूर्णवेळ करण्यात आली आहे. या नियुक्तीबददल अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे आभार मानले आहे.
राज्यामध्ये १ फेब्रुवारी, २०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील कलम १६ ते २१ मध्ये राज्य अन्न आयोगाची रचना व कार्यपध्दती विषद केली आहे. सदर अधिनियमातील कलम १६ (१) अन्वये अधिनियमाच्या अंमलबजावणीवर संनियंत्रण व पुनर्विलोकनाच्या प्रयोजनार्थ राज्य अन्न आयोग गठीत करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राज्यामध्ये ११ एप्रिल, २०१७ च्या शासन अधिसूचनेन्वये राज्य अन्न आयोग गठित आलेला आहे.
तसेच, उक्त अधिनियमातील कलम १६(३) मध्ये आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नियुक्त करण्याची तरतूद नमूद करण्यात आली आहे. शासन आदेश २६.०८.२०२४ अन्वये, सुभाष राऊत यांची सदस्य या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली आहे. शासन निर्णय २८.०४.२०२५ अन्वये, महेश ढवळे यांची अध्यक्ष, राज्य अन्न आयोग या पदावर पुर्णवेळ करण्यात आली आहे. शासन आदेश १५.०७.२०२५ अन्वये अशोक आत्राम, सह सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांची अन्न आयोगाच्या सदस्य-सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्य अन्न आयोगावर पूर्णवेळ सदस्यांची नेमणूक करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील कलम १६ (२) नुसार राज्य आयोगाच्या सदस्य पदी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने सुभाष किसनराव राऊत सदस्य (इ.मा.व.), रणजीत बाबुराव निंबाळकर सदस्य (खुला), मायावती भागीनाथ पगारे सदस्य (अनुसूचित जाती), ईश्वर बळवंतराव बाळबुद्धे सदस्य (इ.मा.व.), माया प्रदिप इरतकर
सदस्य (इ.मा.व.) या सदस्यांची नियुक्ती ही पूर्णवेळ करण्यात आली आहे.