चिटणवीस सेंटरतर्फे भारतातील लोकसंगीत परंपरा कार्यक्रम

प्रसिद्ध गायिका मीनल भिडे यांचा सहभाग

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Tamarind Hall Chitnavis Centre चिटणवीस सेंटरतर्फे “भारतातील लोकसंगीत परंपरा” हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या प्रसिद्ध शास्त्रीय आणि अर्धशास्त्रीय गायिका मीनल भिडे भारतातील विविध प्रांतांतील लोकसंगीत परंपरा त्यांच्या वैशिष्ट्यांसह सादर करणार आहेत.त्यांच्यासोबत आनंद मस्ते आणि त्यांची टीम सहभागी होणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना सिन्हा करतील. प्रेक्षकांना या माध्यमातून लोकसंगीताची समृद्ध परंपरा आणि त्यातील विविधतेचा अनुभव घेता येणार आहे.
 
 
 
madhiri
 
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून तो सर्व संगीतप्रेमींसाठी खुला आहे. Tamarind Hall Chitnavis Centre आयोजकांनी नागपूरातील रसिक संगीतप्रेमींना रविवार, ५ ऑक्टोबरला सायं. ६.३० वा. चिटणवीस सेंटरच्या टॅमरिंड हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:योगिता चकोले संपर्क मित्र