मंगरूळनाथ,
bridge at borva तालुक्यातील बोरव्हा येथील नदीला यावर्षी अनेकवेळा मोठा पूर आल्याने पुराच पाणी पुलावरुन गेले. सदर पुल हा खालच्या बाजूने पुर्णपणे खचल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सबंधित विभागाने या पुलाची पाहणी करुन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काही महिन्या अगोदर कंत्राटदाराने नदीवर बांधलेला हा पूल खालून पूर्णपणे खचलेला आहे. सदर पुल अपघाताला आमंत्रण देत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे. खचलेल्या सिमेंटच्या पुलाची अवस्था पाहिल्यानंतर वाहनचालकांची या पुलावरुन आपल वाहन पुढ नेण्याची हिंमत होणार नाही, इतकी भयानक अवस्था आहे. खालून पूल खचला असतानाही, पुलाच्या वर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा असून, काही ठिकाणी आरपार छिद्र आहेत, तर एका ठिकाणी मोठे भगदाड सुद्धा पडलेल आहे. बोरव्हा गावातील ८० टक्के ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी हा पूल ओलांडावा लागतो. काही दिवसात शेतमाल निघाल्यावर या पुलावरुन ट्रॅटर चालवले जातील. आजही अनेक लहान मोठी वाहन या पूलावरुन धाडसान जात आहेत.
सिंगडोह व रोहना अशा गावांना या मार्गावरुन जाण अनिवार्य आहे. गावातील पाणी पुरवठा विहिरीवर ईतर सर्व गावातील वाहतूक याच मार्गावरुन होते. बैलगाडी, ट्रॅटर, अशा वाहनांनी जीर्णावस्थेत असलेला हा पूल ओलांडण अतिशय धोकादायक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामस्थांनी कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.