वर्धा,
national accreditation competition जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरील नागरिकांना आरोग्य सेवा देणार्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने राज्यस्तरीय मूल्यांकनाचा उंबरठा ओलांडत राष्ट्रीय मानांकनाच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. ही बाब वर्धा जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रासाठी कौतुकाचीच ठरत आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय मूल्यांकनात वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसुती शस्त्रक्रिया कक्ष सर्वोत्कृष्ट ठरला असून तब्बल ९६ टके गुण मिळाले आहे.
तपासणीत प्रसुती शस्त्रक्रिया कक्ष ठरला सर्वोत्कृष्ट
शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक सुविधा नागरिकांना दिल्या जातात. एनयूएएस राज्य प्रमाणपत्र बाबत जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांची निवड करीत त्यांना या स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते. राज्यस्तरीय समितीने जून व जुलै २०२५ यादरम्यान येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत विविध विभागांची पाहणी केली. पाहणीनंतर राज्यस्तरीय चमूने विविध विभागांना गुण दिले. यात सर्वाधिक गुण जिल्हा रुग्णालयातील प्रसुती शस्त्रक्रिया कक्षाला मिळाल्याचे पुढे आले.
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयासह भंडारा, अकोला, नागपूर, जळगाव, लातूर, ठाणे, सांगली, रायगड, धाराशिव येथीलही रुग्णालयांनी राज्यस्तरीय मूल्यांकनाचा उंबरठा ओलांडला आहे. या दहा रुग्णालयांना राज्यस्तरावरील एनयूएएस प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. तर त्यांची राष्ट्रीय मानांकनासाठीची धाव सुरू झाली आहे. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात वरिष्ठांकडून प्राप्त सूचनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांच्या मार्गदर्शनात सनियंत्रक अधिकारी म्हणून डॉ. चकोर रोकडे यांनी करून घेतली. रुग्णालयात कार्यरत डॉटर, आरोग्य कर्मचारी व अधिकारी तसेच कर्मचार्यांच्या सामुहिक प्रयत्नामुळेच हे शय झाले असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रीय मानांकनही याच सामुहिक प्रयत्नाच्या जोरावर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय मिळवेल, असा विश्वास व्यत करण्यात येत आहे.
कुठल्या विभागाला ९० टयाहून अधिक गुण,अॅसिडन्ट आणि इमरजन्सी : ९३ टके,लेबर रुम : ९५ टके,ओटी : ९५ टके,प्रसुती शस्त्रक्रिया कक्ष : ९६ टके,एसएनसीयू : ९० टके,रेडीओलॉजी : ९२ टके