वर्धा,
Wardha News : संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत कलासाधक संगमचे आज ४ रोजी स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिर येथे सायंकाळी सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री अभिजित गोखले, अखिल भारतीय मंत्री रविंद्र बेडेकर, प्रांताध्यक्ष कांचन गडकरी, पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, संस्कार भारतीचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. राममोहन बेंदूर, संस्कार भारतीचे आधारस्तंभ व स्वागताध्यक्ष हरिभाऊ वझुरकर, वर्धा जिल्हाध्यक्ष सतिश बावसे यांची उपस्थिती होती.
उद्घाटक कौशल इनामदार यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. अभिजित गोखले यांनी संस्कार भारतीची ओळख अजरामर राहणार आहे. सरळ सोपे शब्द करणे, मुल्यांची जपणूक करणे हा संस्कार भारतीचा मुळ उद्देश आहे. कलेचे निर्वाहन करणे हे संस्कार भारती म्हणूनच घडत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संस्कार भारतीची वाटचाल सुरू आहे. संघाच्या मार्गक्रमनेचे सहा टप्पे आहे. संघाचा विचार प्रभावी झाला आहे. स्वीकार आणि सहभाग संस्कार भारतीकडून रूजवले जाते. जबाबदारी जाणीव करून देणे, साध्या सोप्या प्रकाराला सामाजिक दृष्टी देणे हे संस्कार भारतीकडून अंगिकारले जाते. कलाकारांचे संघटन संस्कार भारतीकडून मिळते. संस्कार भारती मूल्यांची जपणूक करण्याचे माध्यम आहे. गेल्या ४५ वर्षांपासून कलाकारांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. कला घटकांमध्ये संस्कार भारतीचे कार्य विकसित व्हावे. सामाजिक व राष्ट्रीय संस्कार देता आले पाहिजे हा संस्कार भारतीचा खरा उद्देश आहे. कलेची दृष्टी विकसित करण्याचे माध्यम म्हणजे संस्कार भारती असल्याचे गोखले म्हणाले.
कांचन गडकरी यांनी आगामी काळात संस्कार भारतीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लोककलाचे संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे. कलेला व्यापकता मिळाली पाहिजे, असे आवाहन केले. संस्कार भारती हा वटवृक्ष झाला आहे. आगामी काळात संस्कार भारती ही अधिक वृद्धींगत व्हावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. बेंदूर यांचा संस्कार भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. बेंदूर यांनी संस्कार भारतीच्या चळवळीत चंद्रकांत घरोटे यांचे योगदान अतुलनीय आहे. संस्कार भारतीची चळवळ ग्रामीण भागात पोहोचली पाहिजे. संस्कार भारतीचे स्व. विश्राम जामदार यांच्या भाषणाने प्रभावित होत आपण संस्कार भारतीसोबत जुळलो असल्याचे ते म्हणाले. सत्काराबद्दल त्यांनी आभार व्यत केले.
कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, भारतीय मंत्री आशुतोष अडोणी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माधव पंडित, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, अविनाश देव, भूपेंद्र शहाणेे, मंगेश परसोडकर, मकरंद उमाळकर आदी उपस्थित होते.