‘मन पैलतीर’ संगीतमय चर्चात्मक कार्यक्रम !

    दिनांक :04-Oct-2025
Total Views |
नागपूर,
World Mental Health Day जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या पूर्वसंध्येला माईंड पार्क फाऊंडेशन तर्फे ऋतुराज प्रस्तुत ‘मन पैलतीर’ हा ज्येष्ठ नागरिकांच्या मनाचा मागोवा घेणारा संगीतमय चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची असून सूत्रसंचालन किशोर गलांडे करणार आहेत. कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉ. शैलेश पानगावकर आणि मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक डॉ. स्वाती धर्माधिकारी यांचा सहभाग राहणार आहे.

nagrik 
 
 
संगीत सादरीकरणात गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर आणि मुकुल पांडे हे गायक सहभागी होणार असून, वादनाची जबाबदारी गोविंद गडीकर, मोरेश्वर दहासहस्त्र, परीमल जोशी,World Mental Health Day विशाल दहासहस्त्र आणि मुग्धा तापस यांच्याकडे असेल.हा कार्यक्रम गुरुवार, ९ ऑक्टोबरला सायं. ६.३० वा. साई सभागृह, व्होकहार्ट हॉस्पिटल मागे, शंकरनगर, नागपूर येथे होणार असून प्रवेश सर्वांसाठी निःशुल्क आहे.
सौजन्य :अभय चोरघडे,संपर्क मित्र