इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात वीज दरवाढ

प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
नागपूर,
electricity tariff hike ऐन तोंडावर महावितरणने वीज दरवाढ करत ग्राहकांना शॉक दिला आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यातील वीज दरात कपात झाली असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता महावितरणने इंधन समायोजन शुल्काच्या स्वरूपात वीज दरवाढ जाहीर केली आहे. परिणामी, ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ करण्यात आली असून घरगुती, व्यावसायिक आणि ग्राहकांना वीज बिलाचा अतिरिक्त भार पडणार आहे.
 

electricity tariff hike  
महावितरणचे सर्क्युलर जारी
मुख्यत: बुधवार, १ ऑक्टोबर रोजी महावितरणने सर्क्युलर जारी करत सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहे. तर पुढील आदेशापर्यंत ही दरवाढ लागू राहणार असल्याची शक्यता असताना वीजेचे दर काही वर्षात कमी होणार असल्याचे महावितरणकडून ग्राहकांना जात आहे.
 
 

दिवाळीत ग्राहकांना बसणार फटका
यापूर्वी १ जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका दिवाळीत ग्राहकांना बसणार आहे. १ ते १०० युनिट वापरावर युनिट ३५ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिक वापरावर ९५ पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे.
 
 
 
अतिरिक्त खर्चाची भरपाई
वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. या अतिरिक्त खर्चाची भरपाई आता इंधन समायोजन शुल्क लादून केली असल्याचे महावितरणकडून सांगितल्या जात आहे.