कारखाली दबून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur car accident, अतिउत्साहाच्या भरात कार पार्क करीत असताना मागे उभा असलेला चार वर्षीय चिमुकला दबून गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कान्हा राहुल देशमुख असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.
 
 

Nagpur car accident,  
शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तो सोनबाजी नगर, भंडारा मार्ग येथे घरासमोरील रेतीवर खेळत होता. नीलेश ज्ञानेश्वर सतीबावणे (35, सोनबाजी नगर, जुना पारडी) हा (एमएच 43 एडब्लू 1256) ही कार घेऊन आला. घराच्या बाजूला कार पार्किंग करण्यासाठी घाई करीत होता. पार्किंग करताना त्याने मागे कुणी असेल याकडे दुर्लक्ष केले व कार थेट कान्हाच्या अंगावरून गेली. त्याच्या किंकाळ्यांनी वस्तीतील लोकांनी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत मुलाला पारडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. त्याचे काका विशाल देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक नीलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.