भंडारा,
dj noise pollution नियम आहेत, पण ते पाळण्यासाठी नाहीत! डीजेच्या कर्कश्य आवाजाचे दुष्परिणाम सर्वांनाच माहिती आहे, तरीही आवाज कमी आणि ज्यांच्याकडे ते करण्यातते करण्याचा अधिकार आहे, त्यांना कर्तव्याची जाणीव होत नाही! अशाच डीजेच्या कर्कश्य आवाजामुळे एका रुग्णालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या व भिंतीला तडे गेले. या उपरही जर पोलिसांना जाग येत नसेल तर मात्र कठीण आहे.
पोलीस म्हणतात आम्ही हतबल!
सण उत्सव मग ते कुठल्याही धर्मीयांचे असो, आनंद घेण्यासाठीच असतात. मात्र त्याचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणामही होतात. सध्या डीजे कर्कश्य आवाजात वाचविण्याचे फॅड प्रचंड वाढले आहे. अवाढंव्य डीजे आणून आवाजाच्या मर्यादेच्या पलीकडे वाजणारे डीजे लोकांसाठी प्रचंड संताप जनक ठरत आहेत. डीजे वाजवताना आवाजाची मर्यादा किती असावी याचे नियम आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मिरवणूक शोभायात्रा कोणत्याही धर्मियांची असो, त्यात पोलिसांचा बंदोबस्त असतो. पोलिसांच्या कानापाशी मर्यादेचे उल्लंघन करून आपल्या कर्तव्याप्रति विसर पडल्यागत वागतो.
दोन दिवसांपूर्वी अशाच एका विसर्जन मिरवणुकीत एकामागे एक असलेल्या तीन डीजेंच्या अमर्याद आणि कर्कश्य आवाजामुळे खांब तलाव रोड मार्गावरील डॉ. व्यवहारे यांच्या रुग्णालयातील खिडकीच्या काचा फुटल्या. एवढेच नाही तर भिंतीला थोडेही गेले. यावरून आवाजाची मर्यादा किती असेल याची कल्पना येऊ शकते.रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी डीजे चालक, मिरवणुकीत सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना आवाज कमी करण्यासंदर्भात विनंती केली. दवाखान्यात रुग्ण होते, हेही सांगण्यात आले मात्र पोलीस आणि डीजे चालकाच्या दृष्टीने ही बडबड वायफळ ठरली. त्याचे दुष्परिणाम दिसून आले. भिंतीला तडे जाऊ शकतात, डीजेच्या संपर्कातील लोकांचा जीवही जाऊ शकतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता कर्तव्यावर असलेले पोलिसच कर्तव्य विसरून वागणार असतील तर मात्र अपेक्षा कुणाकडून करायची? रुग्णालयातील एखाद्या लहान मुलाच्या जीवास धोका झाला असता तर याची जबाबदारी नेमकी कुणी घेतली असती हे पोलीस आणि प्रशासनाने स्पष्ट करावे.
नियमांचे सोंग कशाला?
डीजेला परवानगी देताना आवाजाची मर्यादा आणि अनेक अटी टाकल्या जातात. मग त्या पाण्याच्याच नसतील तर परवानगीचे आणि नियमांचे सोंग कशाला? हा प्रश्न उपस्थित होतो. केवळ कागद रंगविण्यासाठी हे प्रकार होत असतील, तर यंत्रणाही लाचार असल्याचे सिद्ध होते.
परवानगी देणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा : डॉ. व्यवहारे
नियमांचे पालन करून करून सन साजरे व्हावेत. कर्कश्य आवाजातील डीजे जीव घेणे ठरू शकतात. अशावेळी परवानगी देणाऱ्यावरच गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी प्रतिक्रिया डॉक्टर नरेंद्र व्यवहारे यांनी दिली. मिरवणुकीतील पोलिसांना नेतागिरी करायची असेल तर निवडणूक लढवा असे सांगून, ते आपली हतबलता बोलून दाखवतात. पोलीसच असे बोलू लागले तर, सामान्य नागरिकांनी काय करावे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मात्र हे बोलताना डिजे आवाजाचा त्रास त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांनाही होतो हे विसरून चालणार नाही, असेही ते म्हणाले.