तभा वृत्तसेवा
राळेगाव,
heavy rainfall crop damage ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारकोल रॉट व येलो मोझॅक रोगाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतीपावसाने तूर पिक सुकत आहे, कपाशीचे पिक पिवळे पडले असून वाढ थांबलेली आहे. फळबाग उद्ध्वस्त झाल्या आहेत. भाजीपाला पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे.
तर दुसरीकडे केंद्र सरकारने कापूस, तूर, कडधान्या वरील आयात शुल्क पुर्णतः संपवून विदेशातून मोठ्या प्रमाणात आयात करून बाजारातील सोयाबीन, तूर, चना, कापूस, मूग या पिकांचे भाव पाडले आहे. वायदे बाजारात शेतीतील सर्व पिकांचे व्यापारावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयाने शेतकèयांवर सुलतानी आणी आस्मानी असे दुहेरी संकट आणले आहे.
सीसीआयला कापूस विक्रीसाठी किसान अॅपवर नोंदणी करणे, त्यासाठी ई पिक नोंदणीचा सातबारा आवश्यक असून नोंदणीची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 25 केली आहे. नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून अॅपवर नोंदणी करणे त्रासदायक झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.या व इतर समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास 10, 11, 12 डिसेंबर 2025 ला माता सीतेच्या वास्तव्याने पावन भूमी रावेरी (ता. राळेगाव) येथे होणाèया शेतकरी संघटनेच्या महिला अधिवेशनात पुढील निर्णायक आंदोलनाची घोषणा करणार याची शासनाने गंभीरतेने नोंद घ्यावी, असाही इशारा देण्यात आला.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजेंद्र युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन गिरीश तुरके तालुकाध्यक्ष, विक्रम फटिंग, गोपाल भोयर, सुरेश आगलावे, किशोर झोटिंग, आशिष निंब्रड, गजानन ठाकरे, राहुल महाजन, निलेश डवरे, योगेश महाजन, गिरीधर ठमके, संदीप काकडे, गजानन कोल्हे, अशोक वाभीटकर, भास्कर पाटील, मनोज तामगाडगे, अंबादास येरगुडे, प्रफुल वटाणे, चंदूभाऊ उगेमुगे उपस्थित होते.