नागपूर,
Jyoti Bavanakule गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण केल्याने अनेक प्रश्न सुटतात, असा विश्वास भाविकांना असल्यामुळे गजानन विजय’ या पारायण केले जाते.आजच्या धावपळीच्या युगात महाराजांचे स्मरण अनेक समस्यांचे समाधान देणारे असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्योती बावणकुळे यांनी केले.
श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीद्वारे रेशिमबागेतील महर्षी व्यास सभागृहात छोट्या पोथीचे मोठे पारायण झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक कार्तिक शेंडे, गजानन देशपांडे, बालपांडे, गिरीश वराडपांडे, अर्चना ढबाले, डॉ. निखिल भुते आदींची उपस्थिती होती. मोठया संख्येने भाविक पारायणात सहभागी झाले होते.
दैनंदिन जीवनात प्रत्येक व्यक्तीला विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तांना योग्य मार्ग दाखविणारे ठरते. महाराजांच्या जीवनावरील आख्यायिका वाचल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात, असे देशपांडे यांनी सांगितले.