लव्ह जिहाद ही एक सामाजिक गंभीर समश्या : अतुल मोघे

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
वाशीम, 
Atul Moghe : नऊ दिवस शक्तीच जागरण झाल्यावर येणारी विजयादशमी हा संघाच्या स्थापनेचा दिवस. काळाच्या ओघामध्ये कामे करीत करीत संघाला आज शंभर वर्ष पुर्ण झाली. समाजाला संघटीत करायच. राष्ट्राला परम वैभव प्राप्त करुन द्यायच, हे कार्य याची देही याची डोळा पुर्ण झाल. संघटीत समाजाची शक्ती उभी करीत शंभर वर्ष पुर्ण झाले, असे प्रतिपादन रास्व संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी आज, ५ ऑक्टोबर रोजी वाशीम येथे केले. रास्व संघाचा विजयादशमी उत्सव आज येथील रिसोड रोडवरील पाटणी कमर्शियल कॉम्पलेक्समध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक अनिल कावरखे, तालुका संघ चालक नारायणराव जाधव, नगर संघ चालक दिपकराव जहागिरदार उपस्थित होते.
 
 
WASHIM
 
 
 
अतुल मोघे पुढे म्हणाले की, १९२५ साली आपला देश पारतंत्र्यात होता. त्यावेळी हिंदू समाजाची स्थिती अतिशय दयनिय होती. त्यावेळी हिंदू समाज संघटीत होऊ शकतो, हे एक स्वप्न होत. अशावेळी प. पू. डॉ. हेडगेवारांनी संघाची सुरवात केली. पुर्वी अप्रासंगिक वाटणारा संघ आता प्रासंगिक वाटायला लागला आहे. संघाचा त्यावेळी उपहास उडविल्या गेला. डॉक्टरांची खिल्ली उडवायचे. परंतु, या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करून त्यांनी देशाच्या परम वैभवाची वाटचाल सुरू ठेवली. दरम्यान संघाने अनेक आघात सहन केले. गांधी वधासारखे घृणास्पद आरोप लावून संघावर बंदीही लादल्या गेली. चौकशीमध्ये कोणतेही पुरावे नसतांना आपल्या राजकीय स्वार्थासाठी संघावर बंदी घातल्या गेली असा समजही त्यावेळी समाजाचा झाला होता. संघ समाजाला आपला समजतो. समाज आपला आहे, ही संघाची विजारधारा आहे.
 
 
जात, पात आणि पंथभेद हे संघाला मान्यच नाही. संघ हे देशमक्तांच, उपयुक्त आणि चांगल्या संस्कारी लोकांच संघटन असल्याचा दृढ विश्वास आजही समाजातील प्रत्येक घटकाचा आहे. समाजाच्या सहभागाने समाजाच परिवर्तन घडविणे हा संघाचा प्रमुख उद्देश आहे. समरसता, पर्यावरण परक जीवनशैली, कुटुंब प्रबोधन, स्वबोध व नागरी कर्तव्य या पंचसुत्रीवर सशक्त समाज निमिर्तीसाठी यापुढे संघ जनजागरण करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले. लव्ह जिहाद ही एक गंभीर समश्या आहे. ही सरकारची समश्या नसून, ती एक सामाजिक समश्या आहे. त्यावर उपायही समाजाला शोधायचा आहे. त्यासाठी कालसुसंगत परंपरेची चर्चा समाजामध्ये व्हायला हवी. मुलांसोबत कौटुबिक चर्चा व्हायला हवी. मुलांच मोबाईल वेड ही आज एक गंभीर समश्या बनली आहे. तो काय बघतो हे सांगण्याऐवजी जर काय बघितल पाहिजे अशी जर कुटुंबामध्ये चर्चा झाली तर त्यामध्ये निश्चितच सुधारणा होईल. शेवटी संघाच्या पंच परिवर्तनामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
 
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. कावरखे म्हणाले की, आजचा दिवस हा अधर्मावर सत्याच्या विजयाचा दिवस असून, शक्ती व शस्त्र पुजनाचा दिवस आहे. आज संघाला शंभर वर्ष पुर्ण झाली आहे. संघ आज विशाल वटवृक्ष झाला आहे. राष्ट्र प्रथम ही भावना कायम ठेवून संघाने निरंतर वाटचाल केली आहे. भारत मातेवर प्रेम करणारे स्वयंसेवक संघाने निर्माण केले आहे. त्याग आणि आदर्शाच मुर्तीमंत उदाहरण संघ आहे. संघाची सेवाभावी वृत्ती वाखाणण्यासारखी असून, समाजामध्ये आलेल्या प्रत्येक विपत्तीला तोंड देण्यासाठी संघ सदैव अग्रेसर असतो. विविधतेने नटलेला हा देश असून, भौतिक सुखापायी आम्ही र्‍हास करीत आहोत. पर्यावरण बिघडल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या नादात आम्ही आमची शाश्वत मुल्ये विसरत आहोत. मात्र, संघाचे सर्व बाबीवर होणारे जनजागरण हे उत्कृष्ट कार्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपुजन त्यानंतर प्रार्थन झाली. यावेळी स्वयंसेवकांनी योग, प्रात्यक्षिक, सांघिक गीत व अमृत वचन सादर केले.