मुंबई
Madhuri Dixit Sanjay Dutt बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या नात्याबाबत नेहमीच चाहत्यांमध्ये आणि मीडिया मध्ये चर्चा असते. विशेषतः १९९० च्या दशकात या दोघांच्या नात्याला आणि अफवांना मोठा रंग चढला होता. आता लेखक हनीफ जावेरी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यांनी या दोघांच्या संबंधांबाबत काही मोठे दावे केले आहेत.
हनीफ जावेरी यांनी ‘मेरी सहेली’ या प्रकाशनाशी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, संजय दत्त यांच्या १९९३ मधील मुंबई बमस्फोटाच्या प्रकरणी अटक झाल्यानंतर माधुरी दीक्षित यांनी त्यांच्यापासून दूर राहणे सुरू केले होते. त्यांनी सांगितले की, संजय जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने त्यांना समर्थन देत त्याच्या अटकेविरोधात निषेध प्रदर्शन केले होते. मात्र, माधुरी दीक्षित यांनी या निषेधात सहभागी होण्यास नकार दिला होता.
जमानतीवर सुटल्यावर, दिग्दर्शक अफझल खान यांनी एक पार्टी आयोजित केली होती ज्यात माधुरीही उपस्थित होणार असल्याचे सांगितले होते. परंतु पार्टीत माधुरी स्टेजवर जाण्याऐवजी एका बाजूला बसल्या आणि थोड्या वेळानंतर ती पार्टीतून निघून गेल्या. हनीफ यांनी सांगितले की, संजय दत्त यांच्या अटकेनंतर फोटोग्राफर्स माधुरी आणि संजय यांचा एकत्र फोटो काढण्याची वाट पाहत होते, पण माधुरी यांनी तो क्षण टाळण्याचा निर्णय घेतला होता.लेखक हनीफ जावेरीच्या मते, माधुरी आणि संजय काही काळ रिलेशनशिपमध्ये होते आणि माधुरीच्या मातेला त्यांची लग्नं व्हावीत अशी इच्छा होती. परंतु संजय दत्तांच्या अटकेनंतर माधुरी यांनी त्यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना भिती वाटत होती की त्यांच्यावरही काही चौकशी होऊ शकते.त्यानंतर अनेक वर्षे माधुरी आणि संजय यांनी एकत्र काम केले नाही. मात्र, २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कलंक’ या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकत्र काम केले होते. त्यांच्या नात्याचा हा खुलासा चाहत्यांमध्ये मोठी चर्चा निर्माण करीत आहे. बॉलिवूडच्या इतिहासातील हा एक संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग मानला जातो.या वक्तव्यांमुळे संजय-माधुरीच्या नात्याविषयी पूर्वीच्या अफवांना एक वेगळा पैलू लाभला आहे, ज्यामुळे चाहत्यांना या जोडीची खरी कथा जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.