तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Mangi Ashtona : राळेगाव तालुक्यातील मंगी आष्टोना शेत शिवारामध्ये एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने शिवारातील शेतकèयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाघ येथील एका शेतकèयाला दिसून आला. शेतात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आल्याने त्या वाघाचा शोध वनविभागाकडून घेतला जात असून तो पट्टेदार वाघ मात्र अद्याप वनविभागाच्या कॅमेèयात कैद झालेला नाही.
मारेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत आष्टोना मंगी शेत शिवारात शनिवार, 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या दरम्यान मंगी येथील शेतकरी जयवंत खडसे हे आपल्या मजुराला घेऊन शेतात फवारणी करीत असताना त्यांना वाघ दिसला. वाघाला पाहून ते भयभीत झाले व तत्काळ त्यांनी शेतातील गोठ्याचा आडोसा घेतला. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वन विभागाची चमू दाखल झाली. त्यांनी पाहणी केली असता वाघाच्या पंजाचे ठसे शेतात आढळून आल्याने त्या दिशेने वाघाचा शोध घेतला जात आहे. वन अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून मंगी आष्टोना शिवारात ठाण मांडून आहेत. वनविभाग शिवारातील शेतकèयांच्या मदतीने व ड्रोनच्या सहाय्याने चार वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून वाघाचा शोध घेतला जात आहे.
मंगी आणि आष्टोना शिवारात वाघ असल्याने ग्रामपंचायत व वन विभागाच्या वतीने खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये दवंडी देण्यात आली आहे. तसेच शेत शिवारातील शेतकèयांनी काळजी घेण्याचे आवाहनसुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी हटकर यांनी केले आहे
वाघाचे पगमार्क : बळीराजात धास्ती
राळेगाव तालुक्यातच मागील 4 ते 5 वर्षांपूर्वी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्या वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला होता. तेव्हा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वनविभागाकडून त्या वाघिणीला ठार मारण्यात आले व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता.
मात्र शेतशिवारात पुन्हा वाघाचे दर्शन झाल्याने पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राळेगाव तालुक्यातील आष्टोेना मंगी जंगल शेतशिवारात शेतकरी शेतमजुरांना वाघाचे पगमार्क (पाऊलखुणा) आढळून आल्याने शेतकरी, शेतमजुरांत भीती आहे.
वाघ ‘त्या’ परिसराबाहेर ?
नागरिकांनी वाघाबाबत माहिती वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे व वनविभागाला दिली. त्यांच्यासोबत मलमकर, सावरकर, सिडाम, नैताम, मडावी यांनी आष्टोना, मंगी जंगल परिसरातील शेतांत पाहणी केली असता वाघाचे ‘पगमार्क’ आढळून आले. तसेच ड्रोन कॅमेèयाद्वारे वाघाचा शोध घेतला असता वाघ मात्र दिसला नाही. पाऊलखुणांवरून वाघाने आपला मोर्चा दहेगाव, किन्ही देवधरी शेतशिवाराकडे वळविला असल्याची माहिती वनपाल टोंगे यांनी दिली.