अनिल कांबळे
नागपूर,
Married lover suicide : बजाजनगरातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विवाहित तरुणाने प्रेयसीच्या लग्न करण्याच्या तगाद्याला कंटाळून गळास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुलांच्या वस्तीगृहात उघडकीस आली. ईश्वरलाल चाैधरी (28, बाडनेर, राजस्थान) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
ईश्वरलाल हा विवाहित असून त्याला दीड वर्षाचा मुलगा आहे. ताे नागपुरात कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. एग्रीच्या शेवटच्या वर्षाला शिकत हाेता. गेल्या वर्षभरापूर्वी त्याच्या महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या तरुणीशी त्याची मैत्री झाली. दाेघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. ईश्वरलालने स्वतः विवाहित असल्याचे तरुणीकडून लपून ठेवले हाेते. गेल्या दाेन महिन्यांपूर्वी प्रेयसीला ईश्वरलालच्या पत्नीबाबत माहिती मिळाली. त्यामुळे तिचा पारा भडकला. लग्नाचे आमिष दाखवून दगा दिल्यामुळे तिने ईश्वरलालला पत्नीला घटस्ाेट देऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकला.
त्यामुळे ताे गेल्या आठवड्याभरापासून तणावात हाेता. एकीकडे कुटुंब, पत्नी, मुलगा आणि दुसरीकडे प्रेयसीची ब्लॅकमेलिंग अशा चक्रात ताे अडकला हाेता. त्याने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वसतीगृहातील खाेलीत गळास घेऊन आत्महत्या केली. दार लावून दिसल्यामुळे त्याच्या मित्राने आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डाेकावून बघितले. त्याला ईश्वरलाल गळास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी बजाजनगर पाेलिसांना माहिती दिली. या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
कायदे मुलींच्या बाजूने
‘आपल्या देशात सर्व कायदे मुलींच्याच बाजूने आहेत. त्यामुळे कुणाकडे तक्रार करावा आणि कुठे न्याय मागावा, असा प्रश्न पडला आहे. मुली ब्लॅकमेल करतात. पाेलिसात तक्रार देण्याची धमकी देतात. या सर्व प्रकाराला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे,’ अशा मजकुराची सुसाईड नाेट लिहून ठेवली आहे.