नागपूर,
Martyr Shankar Memorial झेंडा चौक, महाल परिसरातील शहीद शंकर स्मारकासमोरील मेन लाईनवरील व्हॉल्व अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बदलण्यात आला होता. परंतु तो काही दिवसांतच पुन्हा खराब झाला असून गेल्या २० ते २५ दिवसांपासून सतत पाणी वाहत आहे. यामुळे नागपूर शहरात अमूल्य पाण्याची नासाडी होत असून नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी आरोग्यधोका निर्माण झाला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाने या गळतीकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्तीची कार्यवाही करावी,Martyr Shankar Memorial अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सौजन्य :विवेक मेंढी,संपर्क मित्र