अनिल कांबळे
नागपूर,
minor girl sexual assault एका निर्माणाधीन इमारतीवरील सुरक्षारक्षकाने वस्तीतील पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यादरम्यान, कुकृत्य करताना ताे एका मजुराला दिसला. त्याने वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी आराेपीला चांगला चाेप दिला. त्यानंतर बेलतराेडी पाेलिसांच्या ताब्यात दिले. माणुसकीला काळिमा फासणारी घटना बेलतराेडी परीसरात समाेर आली. शुभम इखार (21, हुडकेश्वर) असे आराेपीचे नाव आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा बेलतराेडीतील एका बहुमजली निर्माणाधीन इमारतीवर सुरक्षारक्षक आहे. गेल्या 3 ऑक्टाेबर राेजी ताे इमारतीच्या खाली उभा हाेता. दरम्यान, बांधकामावर मजूर असलेल्या एका दाम्पत्याची पाच वर्षीय मुलगी इमारतीच्या आतमध्ये खेळत हाेती. शुभमने तिला चाॅकलेट देण्याच्या बहाण्याने पाचव्या माळ्यावर नेले. तेथे तिच्याशी लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, एक मजूर पाचव्या माळ्यावरून खाली उतरत असताना शुभम त्याला दिसला. त्याने लगेच अन्य नागरिकांना बाेलावून घडलेला प्रकार सांगितला. वस्तीतील नागरिकांनी शुभमला चांगला चाेप दिला. त्यानंतर बेलतराेडीचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांना माहिती दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन लगेच आराेपीला अटक केली.