अनिल कांबळे
नागपूर,
Akhtar couple road accident Italy इटलीतील राेम शहरात झालेल्या अपघातात ठार झालेल्या अख्तर दाम्पत्यांचा मृृतदेह नागपुरात आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले असून साेमवारी मृतदेह नागपुरात पाेहचणार आहे. अख्तर यांचे नातेवाईक इटलीला पाेहचले असून त्यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस संपर्कात आहेत. तसेच भारतीय दूतावासाशी नियमितपणे संपर्क साधून प्रयत्न करण्यात आले आहेत.
इटलीत पर्यटनासाठी गेलेल्या नागपुरातील दाम्पत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला हाेता. जावेद अख्तर (55, सिव्हिल लाइन्स) आणि त्यांची पत्नी नादिरा गुलशन (47) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. तसेच या अपघातात त्यांची माेठी मुलगी आरजू अख्तर (22) तर धाकटी मुलगी शिफा अख्तर (20) आणि मुलगा जाजेल अख्तर (14) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. जावेद अख्तर हे सीताबर्डी येथील हाॅटेल गुलशन प्लाझाचे मालक आहेत. जावेद अख्तर दरवर्षी नवरात्रीत त्यांच्या कुटुंबासह विदेशात पर्यटनाला जात असतात.
यावेळी ते 23 सप्टेंबर राेजी त्यांची पत्नी नादिरा गुलशन, मुलगी आरजू अख्तर आणि शिफा अख्तर आणि मुलगा जाजेल अख्तर यांच्यासह इटली-राेमला गेले हाेते. 5 ऑक्टाेबर राेजी कुटुंब नागपूरला परतणार हाेते. गुरुवारी सकाळी इटलीच्या ग्राेसेटाजवळ हे कुटुंब सहलीसाठी निघाले हाेते, त्यांच्या बसला मालवाहक वाहनाने धडक दिली. या अपघात अख्तर दाम्पत्य ठार झाले. दरम्यान, त्यांचा पुतण्या गुड्डू अख्तर हा तात्काळ एका नातेवाईकासह इटली पाेहाेचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय दुतावाशी संपर्कात राहून मृतदेह लवकरात लवकर नागपूरला आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच ते नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. साेमवारपर्यंत दाेन्ही मृतदेह आणि जखमींना विशेष विमानाने नागपूरला आणले जाईल, अशी माहिती आहे.