वर्धा,
Saibaba Punyatithi श्री साई सेवा मंडळाच्या वतीने साईबाबा पुण्यातिथी महोत्सवाचे आयोजन स्थानिक साईबाबा मंदिरात करण्यात आले होते. आज रविवार ५ रोजी सायंकाळी ६ वाजता साईबाबांची पालखी शोभायात्रा काढून या महोत्सवाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी बॅण्ड पथकाने आरती, मुलींचे लेझिम नृत्य आणि महिलांनी सादर केलेल्या गरबा नृत्याने वातावरणात चैतन्य पसरले.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक अनुराग जैन, सयाजी महाराज, अंबिका सोशल फोरमच्या अंबिका हिंगमिरे, डॉ. खेर, साई संस्थानचे सचिव सुभाष राठी यांनी साईबाबांच्या पालखीचे पूजन केले.
यावेळी प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. बॅण्ड पथक आणि टाळ मृदंगाच्या गजरात साईबाबांची पालखी शहरातील प्रमुख मार्गाने मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे पूजन केले. पालखीतील साई भतांसाठी नाश्तासुद्धा ठेवला होता. या पालखी सोहळ्यातच वर्धेकरांना शिर्डी येथील साईबाबांच्या मूळ पादुकांचेही दर्शन घेतले. सोमवार ६ रोजी सकाळी १० वाजता मयुर महाराज दरणे यांचे गोपालकाल्याचे कीर्तन तर सायंकाळी हिंगणघाट येथील साईस्वर यज्ञच्या वतीने भजन संध्या होणार आहे.