भगवंताला आवडेल असे माझे कार्य असावे : श्रेयस बडवे

    दिनांक :05-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
Shrayas Badve प्रत्येक कार्य करताना मी जे करीत आहे ते भगवंताला आवडायला हवे, नव्हे खरे तर जे भगवंताला आवडते तेच कार्य मी करायला हवे. कार्याचा हा ‘सेट-अप’ बिघडला तर माणूस ‘अप-सेट’ होतो, असे पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार शेयस महाराज बडवे यांनी कीर्तनातून व्यक्त केले.
 

Shrayas Badve  
ते पुढे म्हणाले, संतांनी मानवाला उपदेश करताना कधीही कंटाळा केला नाही. उलट त्याचा उद्धार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला. कारण समोरच्या जीवाची माया दूर करणे हेच त्यांचे कार्य होते आणि अशी माया सुटणे यालाच थोर भक्ती म्हणतात. वणी येथील जैताई मंदिरात सुरू असलेल्या शारदीय नवरात्रातील चार दिवसांच्या कीर्तना सेवेपैकी तिसèया दिवशी ते, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची या संतशेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करीत होते.मध्यंतरात बंडोपंत भागवत यांनी कीर्तनकारांचा सन्मान केला. अरुण दिवे यांनी प्रेमभावे ओवाळीतो गीत तुझे गाऊनी हे जगदंबेचे स्तवन सादर केले. उत्तररंगात अवंती नगरीत म्हणजे उज्जयिनीत भगवान महांकालाच्या मंदिरात राजा रामभद्र आणि मच्छिंद्रनाथांचा संवाद स्वरूप कथाभाग सादर करीत पुढच्या जन्मी राजा रामभद्राची गुणवती नाम पत्नी मुक्ताई रूपात तर तो राजा चांगदेवांच्या रूपात अवतरीत झाल्याची कथा सांगून बडवे बुवांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनाला संवादिनीवर अरुण दिवे, तर तबल्यावर शुभम बोबडे यांनी साथ दिली. संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले.
 
 
श्री देवदेवेश्वर मंदिरात पंचावतार उपहार व संतपूजन सोहळा
महानुभाव पंथीयांचे Shrayas Badve महास्थान असलेल्या देवदेवेश्वर संस्थानच्या दत्तमंदिराच्या प्रांगणात जगतगुरू विश्वविधाता शी दत्तात्रेय प्रभू यांच्या असीम कृपेने शनिवार, 4 ऑक्टोबरला पंचावतार उपहार व संतपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.या सोहळ्याचे आयोजन सदभक्त अमोघ कपाटे यांनी केले होते.
 
 
श्री देवदेवेश्वर संस्थानच्या दत्त मंदिरात मधुकरबाबा कवीश्वर, कवीश्वर कुलाचार्य खामणीकर बाबा, विद्वान्स बाबा, कापूसतळणीकर बाबा, साळकर बाबा, न्यायंबास बाबा, पाचराऊत बाबा, गोपीराज बाबा, लाड बाबा, मुधोव्यास बाबा, एकोबास बाबा या विद्वत संत महंतांच्या उपस्थितीत स. 7-30 वा. शी दत्तात्रेय कवच पारायणाचे पठण, 9 वा. देवास मंगलस्नान व महाअभिषेक, दु. 12 वा. विडा अवसर समर्पण व पंचावतार उपहार हा विधी संपन्न झाला. दु. 1 वा. मधुकर शास्त्री यांच्या अध्यक्षतेत संतपूजन सोहळा पार पडला. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.
 
 
या सोहळ्याला 300 ते 350 संत मंडळीची उपस्थिती लाभली. सोहळ्याचे औचित्य साधून सुरेश आराध्ये यांनी साकारलेल्या रांगोळीचे संत महंत मंडळींचा आशीर्वाद लाभला. सोहळ्यासाठी योगीराज विद्वान्स, मुरामल्ले व्यास शास्त्री यांनी परिशम घेतले. आयोजक सद्भक्त अमोघ कपाटे यांनी सर्वांचे आभार मानले.