तभा वृत्तसेवा
दारव्हा,
Donation to Old Age Home : येथील नारायण साधुबुवा चिरडे वृद्धाश्रमामध्ये ताराबाई माणिकराव राऊत यांचा थोरला मुलगा श्याम राऊत याचे 16 सप्टेंबरला निधन झाले. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृद्धाश्रमात उपयोगी येणाèया वस्तू, तसेच 21 हजार रुपये देणगी दिली.
त्यांच्या धाकटा मुलगा गणेश राऊत याला ताराबाईंनी मनातील संकल्प बोलून दाखविला. गणेश राऊत यांनी तो पूर्ण करून वस्तू व रक्कम वृद्धाश्रमात जाऊन वृद्धाश्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष नारायण जवळकर आणि सचिव तथा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय दुधे यांचे स्वाधीन केली. यावेळी कैलास ढोरे, स्वामी समर्थ केंद्राचे अनिल सरतापे, कैलास मेश्राम, शिरीष मराठे, संकल्पचे श्याम पांडे, लक्ष्मण नवरंगे, किशोर नरवडे, अनिल पळसकर उपस्थित होते.