नागपूर,
vidarbha-wins-irani-cup ईराणी कप २०२५-२६ चा सामना नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर खेळवला गेला, जिथे रणजी विजेता विदर्भाने उत्कृष्ट कामगिरी करत रेस्ट ऑफ इंडिया (आरओआय) ला ९३ धावांनी पराभूत केले. या विजयासह विदर्भाने तिसऱ्यांदा ईराणी कपच्या विजेतेपदावर नाव कोरले. यापूर्वी संघाने २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्येही ही ट्रॉफी जिंकली होती.

विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाचा डाव जबरदस्त ठरला. सलामीवीर अथर्व तायडेने शानदार शतक झळकावले, त्यांनी १४३ धावा केल्या, ज्यात १५ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता. यश राठोडनेही ९१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दोघांच्या दमदार भागीदारीमुळे संघाने पहिल्या डावात ३४२ धावांचा टप्पा गाठला. आरओआय कडून आकाश दीप आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी ३ बळी घेत संघावर दबाव ठेवला. आरओआय फलंदाजीसाठी उतरली तेव्हा विदर्भाच्या गोलंदाजांनी त्यांना टिकू दिले नाही. vidarbha-wins-irani-cup आरओआय २१४ धावांवर ऑलआउट झाली. कर्णधार रजत पाटीदारने ६६ आणि अभिमन्यू ईश्वरनने ५२ धावा केल्या. यश ठाकूरने गोलंदाजीमध्ये चार बळी घेत संघाची स्थिती मजबूत केली, तर हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी दोन बळी घेत संघावर दबाव कायम ठेवला.
पहिल्या डावात आघाडी मिळाल्यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात संयमित फलंदाजी केली आणि संघाने २३२ धावा केल्या. ROI साठी ३६१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. आरओआयने शेवटच्या डावात लढाऊ खेळ केला, तरीही संघ २६७ धावांवर ऑलआउट झाला. हर्ष दुबेने दुसऱ्या डावात ४ बळी घेत संघाला विजयाची खात्री दिली, तर यश ठाकूर आणि आदित्य ठाकरे यांनी प्रत्येकी २-२ बळी घेत आरओआयच्या आशा अपुर्या ठेवल्या. अथर्व तायडेच्या शतकिय खेळी आणि यश ठाकूरच्या घातक गोलंदाजीमुळे विदर्भाचा विजय निश्चित झाला. vidarbha-wins-irani-cup नागपूरच्या पिचवर ही कामगिरी विदर्भाच्या वाढत्या वर्चस्वाचा पुरावा ठरली आहे.