घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड

रोख १३ हजार रुपये हस्तगत

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
steadfast thief स्थानिक आसमाणी नगर येथे घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड करण्यात येथील शहर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १३ हजार रुपये रोख आणि एक मनगटी घड्याळ जप्त करून या गुन्ह्याची उकल केली आहे. स्थानिक के .एन.कॉलेज जवळ आसमानी नगर असून, येथील रहिवासी फिर्यादी अब्दुल जावेज मजीद आसमानी हे २७ जून २०२५ रोजी घर कुलुपबंद करून संपूर्ण कुटुंबासह हजयात्रेसाठी बाहेरगावी गेले होते.
 
 

घरफोडी  
 
 
ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता परिवारासह घरी परतले असता त्यांना त्यांच्या घराचा दरवाजा तुटलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांच्या घरातील कपाटातून ५० हजार रूपये रोख व ५०० रुपये किमतीची एक काळया रंगाची मनगटी घड्याळ असा एकूण ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी नोंदवलेल्या फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक तज्ञ, सीसीटीव्ही फुटेज व नागरिकांची विचारपूस तथा रेकॉर्डवरील चोरांचे बयान या आधारे पोलिसांनी तपास करून गुन्हा उघडकीस आणला.steadfast thief पोलिसांनी याप्रकरणी अट्टल चोरटा हसन उर्फ ईम्मी छट्टू निमसुरवाले रा. गवळीपुरा यास ५ ऑटोबर रोजी दुपारी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून रोख १३ हजार रुपये व एक मनगटी घड्याळ जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप पाडवी व पोलिस निरिक्षक दिनेशचंद्र शुला यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप पवार, पोलिस कर्मचारी मयुरेश तिवारी, अजय धनकर, उमेश बिबेकर, नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत, मोहम्मद परसुवालेआदींनी केली आहे.