संघ म्हणजे चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माण केंद्र! : प्रा. दिलीप जोशी

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
मालेगाव,
prof dilip joshi ५ ऑटोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालेगाव शाखेचा शस्त्रपूजन विजयादशमी उत्सव शहरातील हर नारायण मंगल कार्यालयाच्या भव्य प्रांगणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अस्थिरोग तज्ञ डॉ.श्याम काटेकर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून विद्या भारती विदर्भ प्रांताचे सहमंत्री विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी हे होते. जिल्हा संघचालक शंकरराव ढोबळे मंचावर उपस्थित होते.
 
 
 दिलीप जोशी
 
 
उत्सवात बोलतांना प्रमुख वक्ते दिलीप जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनिक शाखा म्हणजे चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माणाचे केंद्र असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. अनेक उदाहरणे देवून त्यांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचारही मांडला. पुढे बोलताना जोशी म्हणाले की शंभर वर्षात संघ सार्वभौम, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी झाला असून दैनिक शाखेतून देवदुर्लभ कार्यकर्ते निर्माण झाले त्यातून हे राष्ट्र परम् वैभवाला जावे यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. संघाच्या शताब्दीच्या निमित्ताने सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरीकर्तव्ये आणि स्वदेशी या पंचपरिवर्तनावर त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीने प्रकाश टाकला. तीनशे सत्तर, श्रीराम मंदिर निर्माण, समाननागरी कायदा अशा विषयावर बोलून प्रत्येक हिंदूने आपल्या घरात हिंदू संस्कार जपण्याची आवश्यकता त्यांनी मांडली. आपले घर भारतात असून घरात भारत आहे का? हा विचार करण्याची गरज त्यांनी विविध उदाहरणाने सांगितली. प्रमुख अतिथी डॉ.शाम काटेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राष्ट्रभक्तांचे संघटन असून, देशाला त्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. या विजयादशमी पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू झाल्याचे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार नगरकार्यवाह प्रशांत बोरकर यांनी केले. सुरुवातीला वैयक्तिक गीत संदिप दशपुते तर अमृत वचन मयूर भांडेकर, सुभाषित अथर्व वायचाळ यांनी केले.prof dilip joshi कार्यक्रमा पूर्वी शहरातून भव्य पथसंचलन निघाले. शहरातील रस्त्यावर सडा रांगोळ्यानी रस्ते सजविलेले- ठिकठिकाणी नागरीकांनी पुष्प वर्षाव करून पथ संचलनाचे स्वागत केले. विजयादशमी उत्सवाला शहरातील प्रतिष्ठित श्रीकिसन मानधने. डॉ भगीरथ जाजू, धिरज शहाणे, स्वाती आसरकर, संदिप लहूटे, गणपत सोभागे यांचेसह संघ प्रेमींची मोठ्या संख्येत भरगच्च उपस्थिती दर्शविली.