animal census जिल्ह्यात २० वी पशुगणना टॅबच्या सहाय्याने झाली होती तर २१ वी पशुगणना ‘२१ सेन्सर’ या मोबाईल अॅपच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील १४०६ गावे आणि ६ नगरपालिका तसेच ४ नगरपंचायतींच्या २२० वार्डात पशुगणनेच्या उद्देशाने विशेष सर्वेक्षण करण्यात आले. पण, बराच कालावधी लोटूनही अंतिम अहवाल जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. परिणामी, पशुसंवर्धन विभागातील अधिकार्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पशुगणनेतील पशुधनाच्या संख्येनुसार विभागाची पुढील ध्येय धोरणे आणि पशुसंवर्धन विषयक योजना निश्चित करण्यात येतात. त्यामुळे प्रगणकाद्वारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनेसाठी महत्वाची ठरणारी आहे. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागामार्फत दर ५ वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. जिल्ह्यात २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेस २५ नोव्हेंबर २०२४ ला सुरूवात झाली. ही पशुगणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात आली. नियोजित वेळेत पशुगणनेचे काम वर्धा जिल्ह्यात पूर्ण केले. या पशुगणनेदरम्यान गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुकूट आदी प्रजातींच्या जाती, लिंग व वय निहाय गणना करण्यात आली आहे. पशुगणनेसाठी नागरी भागाकरिता १०० व शहरी भागासाठी १२ असे ११२ प्रगणक तसेच ग्रामीण भागासाठी १६ व शहरी भागासाठी ९ अशा २५ पर्यवेक्षकांची मदत घेण्यात आली होती.animal census जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार ४०६ गाव, नगर परिषद क्षेत्रातील १५२ वार्ड तसेच नगरपंचायत क्षेत्रात ६८ वार्ड असून या ठिकाणी सर्वेक्षण करून मोबाईल अॅपचा वापर करून जनावरांची माहिती संकलित करण्यात आली. पण, अद्यापही अंतिम अहवाल जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाला मिळालेलाच नाही.