अविनाश घांगरेकर यांना मराठा भूषण पुरस्कार

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Maratha Bhushan Award श्री गुरुदेव सेवा मंडळ आगाराम देवी चौक येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अधिवेशनात, महासंघाच्या १२५ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने, नाट्यनिर्माता अविनाश घांगरेकर यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अविनाश २००८ पासून कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय व राजाश्रयाशिवाय राष्ट्रीय, सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक विषयांवर नाट्य निर्मिती करत आहेत. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘श्रीमंतयोगी’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीवर आधारित ‘हम करे राष्ट्र आराधन’ हे महानाट्य आहेत, ज्यांचे देशभरात शंभराहून अधिक प्रयोग झाले आहेत.
 
Maratha Bhushan Award
 
अविनाश यांची नाट्य निर्मिती तसेच प्रस्तुती मान्यवरांनी कौतुक केले. यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा समावेश होता. Maratha Bhushan Award अविनाश यांचा उद्देश नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र पोहोचवणे आणि कमी खर्चात महानाट्य सादर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत प्रेरणा पोहोचवणे हा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी महाराजांपासून प्रेरणा घेतली, आणि त्यांच्या ध्येयात ते यशस्वी झाले आहेत.

सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र