दुचाकी चोरटा जेरबंद

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
रिसोड,
bike thief रिसोड शहरातील महाराष्ट्र बँकेसमोरून ४ ऑटोबर रोजी दुपारी मोटरसायकल चोरीची घटना घडली असता रिसोड पोलिसांनी सर्व तांत्रिक बाबींचा वेगाने तपास करत अवघ्या काही तासातच आरोपीसह मोटरसायकल ताब्यात घेतल्याची विशेष कामगिरी केली. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्या अंतर्गत येत असलेला शेगाव खोडके येथील संदेश गजानन नरवाडे हे ४ ऑटोबर रोजी दुपारी आपले काही कामानिमित्ताने रिसोड येथे आले असता त्यांनी आपली दुचाकी एमएच २० एस ११ २७ हिरो होंडा स्प्लेंडर बँकेसमोर उभी केली.
 
 

रिसोड  
 
 
मात्र, जेव्हा ते आपले काम आटपून आले असता त्यांना आपली दुचाकी त्या ठिकाणी दिसली नाही. त्यांनी काही वेळ इतरत्र त्याचा शोध घेतला मात्र त्याचा शोध लागला नाही. यावरून खोडके यांनी थेट रिसोड पोलीस स्टेशन गाठले या ठिकाणी फिर्याद नोंदवली. सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत ठाणदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात रिसोड पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी पाहणी केली व अन्य तांत्रिक बाबीचा बारकाईने तपास करून सहा तासातच अशोक दिलीप कांबळे राहणार जिजाऊ नगर रिसोड यास ताब्यात घेतले.bike thief आरोपीने सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबुलीही दिली.
याप्रकरणी रिसोड पोलिसांनी कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीकडून ताब्यात घेतलेल्या दुचाकी ची किंमत २० हजार रुपये असून, सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलिस हवालदार रमेश गोडघासे, प्रशांत राजगुरू, पोलिस अमलदार परमेश्वर भोने, विनोद घनवट, रवी आढागळे, सुनील तिवाले, ठाकरे यांनी केली.