मध्य प्रदेश,
coldrif syrup ban, मध्य प्रदेशमध्ये श्रीसन फार्मास्युटिकल कंपनीच्या 'कोल्ड्रिफ' खोकल्याच्या सिरपमुळे १४ बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने तात्काळ पावले उचलत या सिरपवर संपूर्ण राज्यात बंदी घातली आहे. राज्याच्या औषध प्रशासन विभागाने सर्व जिल्ह्यांतील ड्रग्स निरीक्षकांना सिरपचे सॅम्पल गोळा करण्याचे निर्देश दिले असून, ही नमुने तपासणीसाठी लखनऊ येथील प्रयोगशाळेत पाठवले जातील.
राज्याचे औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यांनी यासंदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून, कोल्ड्रिफ सिरपचा आयात-निर्यात तसेच वितरण पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. या कारवाईमुळे संभाव्य धोके टाळून मोठी दुर्घटना होण्यापासून राज्य वाचू शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.दरम्यान, कोल्ड्रिफ सिरप संदर्भात राज्यभरात औषध निरीक्षकांकडून अचानक छापे टाकण्यात येत असून, लोहिया रुग्णालयातील फार्मसी तसेच रुग्णालयाबाहेरील काही खासगी मेडिकल दुकानांवरही तपासणी करण्यात आली आहे. संबंधित सिरपच्या बाटल्यांचे नमुने गोळा करून त्यांची रासायनिक चाचणी सुरू आहे.
फक्त कोल्ड्रिफच oldrif syrup ban, नव्हे, तर इतरही संशयित औषधांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारने स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की कोल्ड्रिफ सिरपचा पुरवठा, विक्री व साठा यावर तात्काळ बंदी घालण्यात यावी आणि सध्याच्या साठ्याची रिकव्हरी करून योग्य तपासणीसाठी सादर करण्यात यावी.मध्य प्रदेशातील मृत्यूच्या घटनांनंतर उत्तर प्रदेश सरकार सतर्क झाली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन पूर्णतः अॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या औषधांवर कठोर कारवाई केली जाईल, असा संदेश सरकारने दिला आहे.
सरकारच्या या oldrif syrup ban, तातडीच्या आणि कडक निर्णयामुळे औषध नियंत्रण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, नागरिकांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगू लागली आहे. कोल्ड्रिफ प्रकरणात लवकरच अंतिम निष्कर्ष येण्याची शक्यता आहे, जोपर्यंत पुढील तपास सुरू राहणार आहे.