शक्ती संपन्न समाज निर्मिती हे संघाचे कार्य :सुनील जाधव

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
रिसोड,
sunil jadhav शक्ती संपन्न समाज निर्मिती हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे, यासाठीच आपण विजयादशमीच्या दिवशी शस्त्र पूजन करून अधर्मावर मात करण्यासाठी शस्त्रपूजनातून ऊर्जा घेत असतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अकोला विभाग सहकार्य सुनील जाधव यांनी केले.ते रिसोड येथील लायसियम इंग्लिश स्कूलचे प्रांगणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रिसोड शहर तर्फे आयोजित विजयादशमी व शस्त्र पूजन कार्यक्रमात बोलत होते.
 
 

सुनील  
 
 
यावेळी मंचावर प्रमुख अतिथी व्यापारी महासंघाचे सचिव गणेश बगडिया, प्रमुख वक्ते सुनील जाधव, नगर संघचालक महादेव पावडे उपस्थित होते. अमृत वचन, सुभाषित, व्यायाम योग, विविध प्रात्यक्षिक, वैयक्तिक गीत नंतर प्रमुख अतिथींचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना सुनीलजी जाधव म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाले संघाच्या हजारो स्वयंसेवकांनी पाया रचला म्हणूनच आपण आनंदाने शताब्दी उत्सव पाहत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याचे केंद्र आहे. विश्वाचे कल्याण व्हावे हा संघाचा मूलमंत्र आहे. आपल्या मातृभूमीसाठी आपले आयुष्य अर्पण करणे हे संघाचे काम आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली किंवा अघटित घटना घडल्यास संघाचे स्वयंसेवक सर्वप्रथम सेवा कार्य करीत असतात. देव, देश व धर्मासाठी कार्य करणे हे संघाचे वचन आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रमुख अतिथी गणेश बगडिया म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माध्यमातून स्वयंसेवक सेवा कार्य अविरत करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. संघ स्वयंसेवक म्हणजे देशभक्ती ने ओतप्रोत भरलेला नागरिक असून, देशासाठी कार्य करण्याची त्यांची तयारी असते. मी सुद्धा संघाचे संघाचे माध्यमातून शिस्त शिकलो आहे असेही त्यांनी सांगितले.sunil jadhav कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. स्वप्निल साकळे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन मुख्य शिक्षक निखिल जाधव यांनी केले. कार्यक्रमापूर्वी गणवेशधारी स्वयंसेवकांचे नगरातून पथसंचलन निघाले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मातृशक्ती व संघ प्रेमी नागरिक उपस्थित होते.