तहसील कार्यालयात विष प्राशन करणार्‍या शेतकर्‍याचा मृत्यू

    दिनांक :06-Oct-2025
Total Views |
आयुध निर्माणी,
Bhadrawati farmer death भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कुरोडा येथील परमेश्‍वर विश्‍वनाथ मेश्राम (55) या शेतकर्‍याचा 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास जिल्हा समान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 

Bhadrawati farmer death 
मेश्राम आणि त्यांच्या वारसांची नावे न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार गाव नमुना 7 मध्ये नोंदविली जाणे आवश्यक होते. मात्र, महसूल विभागाने मालकी हक्काबाबत वाद आहे असे कारण सांगत आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. दीर्घकाळ प्रकरण प्रलंबित ठेवल्याने मेश्राम मानसिक तणावाखाली गेले आणि शेवटी त्यांनी 26 सप्टेंबरला तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान मेश्राम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आधीच भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडाकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना निलंबित करण्या आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, दोषी तहसीलदार भांडारकर आणि नायब तहसीलदार खांडरे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.